Share

सिमेंटयुक्त पाणी पिल्याने धमदिटोल्यात नागरिकांना विषबाधा

Published On: 

🕒 1 min read

गडचिरोली : कुरखेडा नजीकच्या धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत अज्ञात नागरिकाने सिमेंट टाकल्याने गावात खळबळ माजली आहे. सिमेंटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व पोलिस गावात पोहचले असून, त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.कुरखेड्यापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला गावाचा समावेश नान्ही ग्रामपंचायतींतर्गत होतो. गावातील काही महिला आज सकाळी नेहमीप्रमाणे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या.
काही कुटुंबियांनी पाण्याचा वापर केला. नंतर चहा प्राशन करताच दोन-तीन जणांना उलट्या होऊ लागल्या. काही महिलांनी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. परंतु स्वयंपाकाचीही दुर्गंधी येऊ लागली. काही क्षणातच ही वार्ता गावभर पसरली. घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम घटनास्थळी गेले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.दामले व सहायक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर हेही आपल्या सहकाऱ्यांसह धमदीटोला येथे पोहचले. त्यांनी गावकऱ्यांची चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी सार्वजनिक विहिरीची पाहणी केली असता त्यात सिमेंट हा रासायनिक पदार्थ टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.यावेळी सर्वांनी विहिरीतील पाणी पिऊ नये, असे आवाहन गावकऱ्यांना केले.
डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी करुन औषधोपचार केला. याप्रसंगी सरपंच वर्षा धुर्वे, उपसरपंच सुखदेव कोरेटी हेही उपस्थित होते.नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने व वैद्यकीय अधिकारी वेळेवर पोहचल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर विषबाधा होण्यापासून बचावले. सिमेंट कुणी टाकले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!