Share

देशात विविध भागात पूरपरिस्थिती, महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडाच

Published On: 

पुणे : देशात विविध भागात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आदी राज्यांना पुराचा मोठा तडाखा बसला असून इथं बचाव आणि पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 119 पथकं या भागात तैनात करण्यात आली असून नवी दिल्ली इथं चोवीस तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती एन. डी. आर. एफ. चे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली.

एका बाजूला देशात विविध भागात पुराची समस्या असताना महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडाच असल्याचे समोर आले आहे. सोलापूर,उस्मानाबाद,औरंगाबाद,सांगली,सातारा,नांदेड,यवतमाळ,गडचिरोली आदी भागात अगदी तुरळक पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आतापर्यंत १२२ मिमी पावसाची नोंद याठिकाणी झाली आहे. एवढ्या कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात कृत्रिम पावसाची गरज आहे.

बिहार

बिहारमध्ये बागमती, कोसी, गंडक इत्यादी पाच मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यामुळे उत्तर आणि पूर्व बिहारमधील बारा जिल्हे जलमय झाले आहेत. चौदा लोक मृत्युमुखी पडले असून 25 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. पुरामुळे जयनगर-जनकपूर रेल्वेमार्ग वाहून गेला आहे.

आसाम

आसाममधील 33 पैकी 30 जिल्हे पुरामुळे जलमय झाले आहेत. 43 लाख लोकांना पुराचा फटका बसला असून मृतांची संख्या 15 झाली आहे. काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्याचा 90 टक्के भाग पाण्याखाली आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेन्द्रसिंह शेखावत आज राज्याची हवाई पाहणी करणार असून त्यानंतर गुवाहाटी इथं एका बैठकीत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!