Share

शोकाकूल वातावरणात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दिला निरोप

Published On: 

🕒 1 min read

निलंगा/प्रदीप मुरमे – काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात निरोप देण्यात आला.दुपारी २ च्या सुमारास पुण्याहून येथील अशोक बंगला येथे त्यांचा पार्थिव शरीर आणण्यात आला.दुपारी २- ते ४ यावेळेत त्यांचा पार्थिव दर्शनासाठी अशोक बंगल्यावर ठेवण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने निलंगावासीयांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले.

सजविलेल्या रथामधून त्यांचा पार्थिव अंतविधीसाठी दापकावेस,अशोकनगर,पेठ मार्गे सिंदखेड रस्त्यालगत असलेल्या शेतात आणण्यात आला.पोलिसांच्यावतीने २१ तोफांची सलामी देवून मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात वैदीक पध्दतीने हा अंत संस्कार करण्यात आला.शासनाच्यावतीने नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व पोलिस अधिक्षक राजेंद्र माने,अतिरीक्त पोलिस अधिक्षक हिंमतराव जाधव,उपविभागीय अधिकारी विकास माने,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख,तहसीलदार गणेश जाधव यांनी पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली. त्यांचे कनिष्ठ सुपूत्र विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भडाग्नी देण्यात आला.

यावेळी खा.ओमराजे निंबाळकर,माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी मंत्री संभाजीराव पाटील,माजी खा.रुपाताई पाटील,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील,माजी खा.सुनिल गायकवाड,भाजपा युवा नेते अरविंद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे,उपाध्यक्ष भारतबाई साळुंके,जिल्हा दूध संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजेंद्र सुर्यवंशी,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट जि.प.माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,काँग्रेसचे नेते अभय साळूंके,काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, रिपाइंचे विलास सुर्यवंशी,पं.स.माजी सभापती अजित माने,माधव माळी यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थितीत ते अनंतात विलीन झाले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण राम आपल्या सगळ्यांच्या मनात!: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर : हिंदू-मुस्लिम बांधवांनी केली श्रीरामाची आरती;सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!