🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.
अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंत अंतिम मुदत होती. त्यानुसार डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यानंतर २० नोव्हेंबरला डॉ. पटेल यांचे नाव अध्यक्ष म्हणून कांबळी यांनी जाहीर केले होते.
दरम्यान अध्यक्षांच्या नावाची घोषणा कार्यकरिणीच्या बैठकीनंतर नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वीच जाहीर करण्यावरून या प्रकरणी वादाला तोंड फुटले होते. ही प्रक्रिया नियमबाह्य़ असल्याचे सांगत हा वाद धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचला होता. मात्र ‘परिषदेच्या घटनेतील कलमाप्रमाणेच कार्यकारिणीने एकमताने डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची शिफारस नियामक मंडळाला केली असून मंडळाच्या बैठकीत एकमताने त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आल्याचे कांबळी यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206572258770083841?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206578801108385793?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
