टीम महाराष्ट्र देशा – कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे. यातच, आजपासून सुरु होणाऱ्या श्री केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडण्यात आले. परंतु देशभरात सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे केदारनाथ यात्रा देखील सध्या स्थगित असून भाविकांना दर्शनाची मनाई आहे.
दरम्यान, आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी परंपरेनुसार दरवाजे उघडण्यात आल्या नंतर सर्व धार्मिक पूजा-अर्चा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पाहिली पूजा केली गेली. आज मंदिर फुलांनी सजवण्यात आले असल्याने या बर्फाळ परिसरात शोभा निर्माण झाली होती.
बर्फाळ हवामानामुळे फक्त हे मंदिर ६ महिने भाविकांसाठी खुले करण्यात येते. परंतु सध्या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांसाहित फक्त १६ जणांना या मंदिरात प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. काही फोटो देखील प्रसारित केले असून मंदिराचे विलोभनीय दर्शन घडत आहे.
२६ एप्रिल पासुनच चारधाम यात्रेची सुरुवात झाली असून सद्या हि यात्रा देखील स्थगित केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यामुनोत्री मंदिराचे द्वार उघडण्यात आले होते. तर बद्रीनाथ मंदिराचे द्वार १५ मे ला उघडले जाणार आहेत.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

