औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. मात्र, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये नवीन स्ट्रेन दाखल झाला आहे. त्यामुळे या राज्यात विनाकारण प्रवास करू नका, असा सल्ला एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलाय.
अद्याप कोरोना संपलेला नाही. लस व्यतिरीक्त आपल्याला केवळ खबरदारी वाचवू शकते. मास्क व्यतिरीक्त स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशन सारख्या सवयी आपल्याला कायम ठेवाव्या लागतील. ब्राझीलमध्ये ७० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या होत्या. मात्र, तिथल्या नागरिकांना देखील पुन्हा कोरोना संसर्ग होत असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दररोज जास्तीत जास्त २,००० रुग्ण समोर येत होते. मात्र, आता आकडा ६००० च्या वर गेलाय. अनेक राज्यात टेस्टिंग कमी झाल्यानेही रुग्ण संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही, ना मदत, ना दिलासा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
