पुणे : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये हिंदुत्वाच्या मुद्याने डोके वर काढले असून, आता मनसे पाठोपाठ भाजप देखील आघाडीवर आहे. राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजप युतीसाठी हात मिळवणीची चर्चा जोरात सुरू आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आगामी काळातील अयोध्या दौरा झाल्यानंतर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे पालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण तयारीशी उतरणार आहोत. राज ठाकरे यांना अयोध्या भेटीचे आमंत्रण मिळाले आहे. तसेच ते हा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यानंतर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्ष भाजपाला इशारा दिला आहे. ‘भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, भाजपाला मनसेमुळे नुकसान होऊ शकते’, असे मत त्यांनी व्यक्त केल आहे.
‘भाजपाला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपाचे नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपाचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाही’ असा सूचक इशारा रामदास आठवले यांनी भाजपाला दिलाय.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी रिपाइंला पुण्यात महापौरपद मिळावे अशी मागणीही केली आहे. ‘राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहणार आहे. पुण्यात महापौर पद मिळाले पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. पुण्यात १५ ते २०, तर मुबंईमध्ये ३० ते ३५ जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
- ‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
- फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
- ‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री फिक्स…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
