नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी थंड डोक्याने विचार केला पाहिजे तरच आपण त्यात विजय मिळवू. या काळात काही समाजकंटक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले. तर कोरोनाच्या काळात राजकारण करू नका देशहिताला प्राधान्य द्या असेही आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले.
ते पुढे म्हणाले की, देशात कोरोनाविरुद्ध लढाई सुरू आहे. अशा काळात काही लोकांनी चूक केली तर सर्व समुदायाला दोष देऊ नका. तबलिगी जमातवरून मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावरून भागवतांनी नाव न घेता हे आवाहन केलं. तसेच पालघर प्रकरणात ज्या साधुंची हत्या झाली ते कृत्या अतिश निंदनीय होतं. असं घडायला नको होतं. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारने चांगलं काम केलं आहे. भारत सर्व जगाला औषधं पुरवित आहे. देशातले 130 कोटी लोक आपले आहेत, त्या सगळ्यांसाठी काम करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. अशा संकटाच्या काळात मनोधैर्य न खचू देता काम करावं असंही त्यांनी सांगितलं.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत लाखो स्वयंसेवक काम करत आहेत आणि पुढेही करत राहातील. जनतेने सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. या काळात राजकारण करू नका देशहिताला प्राधान्य द्या असं आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

