Share

दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है! जुन्यावादातून मित्राने केली मित्राची हत्या 

Published On: 

नांदेड : जुन्या वादाच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना असर्जन येथे रात्री घडली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या काही तासातच पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले.

विष्णुपूरी येथील काळेश्वर मार्गालगतचा रहिवाशी असलेला हरमितसिंग रेखासिंग पुजारी (२०) याच्यासोबत काही दिवसापुर्वी वाद झाला होता. याच वादाच्या कारणावरून ९ मे रोजी रात्री असर्जन शिवारातील एम.पी. थियटर्सच्या कंपाऊंडमध्ये आकाश वसंतराव जाधव, कृष्णा पांडू आगलावे व इतर दोन अल्पवयीन मुलांनी दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. हि घटना रात्री ८.३० ते २ वाजेच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, ग्रामीणचे पो. नि. अशोक घोरबांड, स्थागुशाचे पो. नि. द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यामध्ये काही तासातच दोन आरोपींना आज सकाळी ताब्यात घेतले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी रेखासिंग पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि विश्वजित कासले हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!