नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेत थैमान घातलेलं असून तीन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेला करोनाचा खूप मोठा फटका बसला आहे.
याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी केली होती. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती केली होती.
तसेच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी भारताने मदत नाही केली तर काही हरकत नाही, पण मग त्यांनी आमच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवू नये असं म्हटलं आहे. असं वृत्त लोकसत्ता’ने प्रसारित केलं आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जर तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केलात तर आम्ही तुमचे आभारी असू असं सांगितलं आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नाही, तरी काही हरकत नाही. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, आणि ते आम्ही का करु नये ?”.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
