Share

देशाला नव्या संसदेची आवश्यकता आहे की नव्या पंतप्रधानाची ? : कॉंग्रेस

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी झाली. ही इमारत, देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दूरदृष्टीचा अविभाज्य घटक ठरणार असून या रूपाने, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला जनतेची संसद उभारण्याची एक महत्वाची संधी मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांना म्हणजेच 2022 मध्ये या इमारतीत ‘नव भारता’ च्या इच्छाआकांक्षांचे अनुरूप प्रतिबिंब त्यात असेल असं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने नवीन संसद भवन आणि जुन्या संसद भवनच्या इमारतीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. जेष्ठ नेते भाई जगताप यांनी एक रोखठोक सवाल उपस्थित केला आहे.देशाला नव्या संसदेची आवश्यकता आहे की नव्या पंतप्रधानाची असं जगताप यांनी विचारलं आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही ट्विट करुन संसदेच्या नवीन इमारतीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं होते.. नवीन इमारतीचं भूमीपूजन करण्याचा निर्णय ह्रदयद्रावक आणि संवेदनाहीन आहे. देश सध्या आर्थिक मंदीतून जात असताना भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात येत आहे. सरकारचे हे पाऊल म्हणजे अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमात डिजे वाजविण्यासारखे आहे, असे शेरगील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!