बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे दरवेळी बारामतीकरांना सल्ला देत असतात. मागील आठवड्यात त्यांनी जमिनीच्या वादावरुन कोर्टाची पायरी चढू नका असा मोलाचा सल्ला दिला होता. आता यावेळी अजित पवार यांनी आज बारामतीतील तळीरामांना सल्ला दिला आहे.
अजित पवारांनी आज बारामतीकरांना व्यसनमुक्त होण्याचा कानमंत्र दिलं. व्यसनांपासून दूर राहा, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा, अशा शब्दात अजित पवार यांनी तळीरामांना फटकारले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन विभागाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी तळीरामांना फटकारलं. तसेच कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्याचं आवाहनही केलं. आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारा. सकाळी लवकर उठा. कोणतंही व्यसन करू नका. व्यसनं करशाल तर बरबाद व्हाल, असं अजित पवार म्हणाले.
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा. मास्क वापरा. मी फक्त जेवताना आणि पाणी पितानाच मास्क काढतो. काल सगळीकडे गेलो. पण मास्क काढला नाही, असं सांगतानाच तुम्हीही मास्क वापरा. हयगय करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला मदत करणारे अनेकजण उशीरा आलेत. आता माझं भाषण झाल्यावर तुम्ही लगेच उठू नका. नाहीतर म्हणाल झालं बाबाचं आणि निघताल. जरा थांबा. मी सगळ्यांचे सत्कार करणार आहे. जरा शिस्त पाळा माझ्यासारखी, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
बारामती मेडिकल हब होऊ पाहतंय. बारामतीच्या आयुर्वेद महाविद्यालयासाठी 225 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. सर्व सोयीसुविधायुक्त बारामती असावी हे पवारसाहेब आणि सुप्रियाचं स्वप्न आहे, असं सांगतानाच गेल्या काही वर्षात आपण बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं आहे
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

