Share

भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याबाबत इग्लंड सरकारशी चर्चा, मात्र,…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारतीय खेळाडू कोरोनाची लसीचा पहिला डोस घेत आहेत. भारतीय कसोटी संघाचे सदस्य उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि उमेश यादव, शिखर धवन यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळू शकेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लसीच्या पहिल्या डोस नंतर साधारण ४० दिवसांनी लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना दुसरा डोस इंग्लंडमध्येच घ्यावा लागणार आहे. याबाबत बीसीसीआय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डशी (ECB) चर्चा करत आहे. मात्र, युके सरकारने परवानगी नाकारल्यास आम्हाला कोरोना लस भारतातून इंग्लंडमध्ये नेण्याची सोय करावी लागेल. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!