🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसाने राज्यभरात अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतीपिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. अशा परिस्थितीत राज्यभरात मंत्री आणि नेतेमंडळी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देत आहेत. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नुकताच जालना जिल्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांना पंचनामे करताना तसेच पीक विम्यातून लागवड केलेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून केला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पंचनाम्यासह पीक विमाबाबत भेदभाव कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी जिल्हा प्रशानाला दिला. खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ” खचून जाऊ नका स्वतः शिवसेना पक्ष व शासन सर्वार्थाने तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, ” असा धीर खोतकर यांनी यावेळी दिला.
फळबाग उत्पादकांना आधार देत सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे संयम ठेवा, आशा सोडू नका, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे खरीप हंगामातील दमडीही शेतकऱ्यांच्या हाती मिळाली नाही. त्यामुळे आधीच खचलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने काही ठिकाणी रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी केली होती. मात्र, या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचेही नुकसान झाले. त्यामुळे उरली-सुरली आशाही संपुष्टात आली. तेव्हा पंचनामे करताना खरीप बरोबर रब्बी हंगामाची ज्या ठिकाणी पेरणी झाली होती, त्या पिकांचेही स्वतंत्ररीत्या पंचनामे करण्याची मागणी खोतकर यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1191680418757496833?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191680586844274688?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
