Share

ठाकरे सरकारमध्ये सोलापूरला वाटाण्याच्या अक्षता,महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर (अजित उंब्रजकर) : बहुचर्चित ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी करण्यात आला. मात्र या विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळाले नसल्याने महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, आ. संजयमामा शिंदे, सेनेकडून शहाजीबापू पाटील, तानाजी सावंत, कॉंग्रेसकडून आ. प्रणिती शिंदे यांच्यापैकी एकाला तरी संधी मिळेल असे वाटत होते. मात्र यापैकी कोणालाही संधी मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. मागिल मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेले तानाजी सावंत यांना डच्चू देण्याचा निर्णय खळबळजनक मानला जात आहे. एकंदरित या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत.

गेल्या एक महिन्यापासून ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यात महाआघाडीचे 5 आमदार निवडून आले होते. गेल्या मंत्रिमंडळात सोलापुरातून भाजपाचे दोन आमदार निवडून आले होते, त्या दोघांनाही पक्षाने मंत्री केले होते. तसेच शेवटच्या टप्प्यात शिवसेनेकडून तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यात आले होते. भाजप-सेना सरकारच्या काळात जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली होती. त्यामुळे महाआघाडीच्या सरकारमधून कोणाला मंत्रिपद मिळेल, कोण पालकमंत्री होईल, याची उत्सुकता महिनाभरापासून होती. राष्ट्रवादीकडून आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, आ. संजयमामा शिंदे, सेनेकडून शहाजीबापू पाटील, तानाजी सावंत, कॉंग्रेसकडून आ. प्रणिती शिंदे यांची नावे चर्चेत होती. मात्र यापैकी कोणालाही संधी मिळाली नसल्याने तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

सावंतांना डावलण्याचा धक्कादायक निर्णय

मूळचे माढा येथील रहिवारी मात्र परंडा मतदासंघातून निवडून आलेले तानाजी सावंत यांनाही सेनेने मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. गतवेळी त्यांना शेवटच्या टप्प्यात कॅबिनेटमंत्री पद देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना यंदाही स्थान मिळेल असे वाटत होते. मात्र सोलापूर जिल्ह्यात त्यांनी निर्माण केलेल्या गटबाजीमुळे सेनेला जोरदार फटका बसला. शहर मध्य, करमाळा या दोन्ही जागा हातच्या गेल्या. याचा फटका सावंतांना बसल्याची चर्चा आहे.

सुशीलकुमार शिंदेंची राजकीय वजन कमी पडले

कॉंग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळ विस्तारात नक्की समावेश होईल, असे वाटत होते. मात्र त्यांच्यापदरीही निराशाच आली. कॉंग्रेसकडून मंत्रिमंडळात विश्वजित कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या नव्या पिढीला संधी देण्यात आली. मात्र यात प्रणिती शिंदे यांचे नाव घेण्यात आले नाही. यात कुठे तरी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेच राजकीय वजन कमी पडल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!