Share

ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना, मुंबईत गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई : ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीर ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

धरम मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, समीर ठक्कर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा जून आणि जुलै महिन्यात फोटो शेअर केला होता. यावेळी त्याने त्यांची तुलना मुघल राजशी केली होती. त्याने नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली होती.

नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला – अजित पवार

तक्रारीनंतर व्ही पी रोड पोलिसांनी समीर ठक्करविरोधात बदनामीचा तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी समीर ठक्कर याला आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.

पूर्वसूचना न देता मका खरेदी प्रक्रिया बंद; पणन महामंडळाच्या कारभारावर शेतकरी संतप्त….

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!