नवी दिल्ली : राजस्थानमधील घोडेबाजारासाठी महाराष्ट्र भाजपने ५०० कोटी रुपये जमा करुन दिले, असा आरोप करणाऱ्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्यावी, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी सध्या कोरोना हाच आमचा फोकस आहे. ऑपरेशन लोटसमध्ये आम्हाला कोणताही रस नाही, हे देखील स्पष्ट केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु होणार, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यानंतर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांच्याकडून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
तसेच राजस्थानमधील घोडेबाजारासाठी महाराष्ट्र भाजपने ५०० कोटी रुपयांची रसद पुरवल्याचा आरोप करणाऱ्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले. हा दावा करणाऱ्यांनी एकदा डॉक्टरकडे जाऊन स्वत:ला तपासून घ्यावे, असे फडणवीस यांनी म्हटले.
कोरोनाला रोखायला ८० वर्षाचा योद्धा मैदानात, शरद पवार सोलापूरसाठी रवाना
दरम्यान, जस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे.
धोका वाढला : भारतात समूह संसर्गला सुरवात – इंडियन मेडिकल असोसिएशन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

