Share

पुण्याहून जम्मू काश्मीरला 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक रवाना

Published On: 

पुणे : राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केल्यानंतर येथील नागरिकांना परवानगी मिळाली, व जम्मू काश्मीर चे 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने नुकतेच पुण्यातून रवाना झाले.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या जम्मू काश्मीर मधील या विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाची परवानगी मिळवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तेथील परवानगी मिळाल्यानंतर विशेष रेल्वेने हे नागरिक रवाना करण्यात आले.

पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर, भिवंडी, रायगड आदी जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांचा यात समावेश होता. सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी या नागरिकांकडून हमीपत्र भरुन घेणे, आरोग्य तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.

या कामकाजाचे नियोजन उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी नीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील व तहसीलदार विवेक जाधव यांनी केले.हे विद्यार्थी व नागरिकांना मदत करण्याबरोबरच रेल्वे तून जाताना त्यांना फूड पॅकेट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरहद संस्थेचे संजय नहार यांनी केली.

निर्देशांचे पालन केले नाही तर कारवाईसाठी तयार रहा, मुंढेंचा इशारा

दरम्यान, पुणे विभागातून 20 मे पर्यत मध्यप्रदेशासाठी -15, उत्तरप्रदेशासाठी -37 उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -2, राजस्थानसाठी- 5, बिहारसाठी-12 व हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी -3, छत्तीसगडसाठी-3 जम्मू , कश्मीर साठी 1 आणि मणीपूरसाठी 1 अशा एकूण 81 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 1 लाख 6 हजार 841 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

तसेच 21 मे रोजी पुणे विभागातून उत्तरप्रदेशसाठी 12, छत्तीसगडसाठी 1,बिहारसाठी 3, झारखंडसाठी -2,पश्चीम बंगालसाठी-1 ओडीसासाठी 1 अशा एकूण 20 रेल्वे गाडया नियोजीत असून यामध्ये एकूण 26 हजार 735प्रवासी अपेक्षीत आहेत, असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

‘आमची तयारी आहे कोरोनासोबत जगायची पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्यासोबत जगू द्यायची’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!