🕒 1 min read
मुंबई – रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते तर त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असेही नवाब मलिक म्हणाले.
रश्मी शुक्लांच्या वकीलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅप दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
पुण्याच्या सीपी असताना त्या काळातील खासदार, नेते असतील यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे. ज्यापध्दतीने त्या त्यांची ट्रान्स्फर झालेली सांगत आहेत मात्र त्यांची ट्रान्स्फर झालेली नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एसटी’चे प्रशिक्षण पूर्ण मात्र सेवेत घेण्यास टाळाटाळ; उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण!
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप


