Share

धोनीच्या शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर शेती उद्योगात व्यस्त आहे. १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. धोनीच्या शेतमालाला रांचीच्या भाजी बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. मटार आणि टॉम्याटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरग्यानिक कॉलीफ्लॉवरलाही मोठी मागणी आहे. आणि आता त्याचा शेतातील माल थेट दुबईला पाठवण्यात येणार आहे.

तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. नुकतीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली होती. आता ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे. बर्मी कंपोस्ट आणि शेणखत वापरून या ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरचं उत्पादन घेण्यात आले आहे. २० ते २५ रुपये किलोने विकला जाणाऱ्या या कॉलिफ्लॉवरची चव हे केमिकलयुक्त भाजीपेक्षा वेगळी आहे.

India Today नं दिलेल्या वृत्तानुसार धोनीच्या शेतातील फळभाज्या दुबईला पाठवण्यात येणार आहेत आणि याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. झारखंड्या कृषी विभागानं धोनीच्या शेतातील माल दुबईला पाठवण्याची जबाबदारी घेतली आहे. यूएईत कोणत्या एजन्सीला फळभाज्या विकण्यासाठी द्यायची, हेही ठरलं आहे. ऑस सीजन फार्म फ्रेश एजन्सीनं ही जबाबदारी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!