Share

‘धर्मवीर’ने घेतले कोट्टीचे उड्डाण, पहिल्या दिवसाची कमाई…

Published On: 

मुंबई : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट हा १३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित झाला आहे.  शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे आणि निर्माते मंगेश देसाई आहेत. हा सिनेमा ४०० पेक्षा जास्त सिनेमागृहात १० हजाराहून अधिक पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

शिवससेनेचे एक पर्व गाजवणारे व ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघेंकडे पाहिले गेले. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटाने जवळपास २ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आनंद दिघे यांनी राजकारणामध्ये काय काम केलं. कोणत्या घडामोडी घडल्या. ते प्रत्येक प्रसंगाचा कसा सामना करायचे या सर्व गोष्टी चित्रपटातून सांगण्यात आल्या आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक याने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

प्रवीण तरडेचं अभ्यासपूर्ण दिग्दर्शन आणि त्याला प्रसाद ओकची साथ यामुळे धर्मवीर सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच भावला असे म्हणता येईल. गेले काही दिवसांमध्ये बॉक्सऑफिसवर अनेक चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. आता धर्मवीर बॉक्सऑफिसवर कोणते रेकोर्ड तोडतो या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!