Share

फडणवीस साहेब, क्या हुआ तेरा वादा? : वॉटरग्रीड योजनेवरून मुंडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेनंतर आता सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ गडावरून दुष्काळग्रस्त बीडकरांना वॉटरग्रीडचे स्वप्न दाखविले’ असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच वॉटरग्रीडमधून बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची सरकारने चेष्टा केली असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथील गोपीनाथगडाच्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या धरणे पाईपलाईनने जोडण्याच्या वॉटरग्रीड योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करण्याचे जाहीर केले होते. मात्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची खोटे बोलून चेष्टा केली असे मुंडे म्हणाले.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!