Share

धनंजय मुंडेंनी पालकत्व स्वीकारलेल्या नवजात शिवकन्येची घेतली भेट

Published On: 

परळी : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी रविवारी रांदड हॉस्पिटलमध्ये जाऊन चार दिवसांपूर्वी पालकत्व स्वीकारलेल्या शिवकन्येची भेट घेतली. २४ फेब्रुवारी रोजी रेल्वे पटरी नजीक सापडलेल्या नवजात अर्भकाची माहिती कळताच तात्काळ त्या बाळाचे पालकत्व स्वीकारून ना. धनंजय मुंडेंनी त्यांच्या संवेदनशीलतेचा परिचय दिला होता.

त्यावेळी मुंडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त असल्याने मुंबईत होते. आपल्या सहकाऱ्यांकरवी त्या बाळाच्या उपचारांची शहरातील खाजगी रुग्णालयात सोय केली होती. त्यांनंतर परळीच्या दौऱ्यात येताच आवर्जून बाळ शिवकन्येच्या तब्येतीची पहाणी करण्यासाठी दवाखान्यात जाऊन भेट दिली.

यावेळी बाळाची तब्येत उत्तरोत्तर सुधारत असून अजून काही दिवस दवाखान्यातच ठेवावे लागेल असे डॉ. विजय रांदड यांनी सांगितले. यावेळी ना. मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सुंदर गित्ते, विष्णू चाटे, कुमार व्यवहारे हे उपस्थित होते.

समाजाला नकोशी झालेल्या या नवजात शिवकन्येला तिच्या अल्पवयीन मातेने काटेरी झुडुपात टाकून दिले होते. याबाबत माहिती मिळताच ना. धनंजय मुंडे यांनी या बाळाचे पालकत्व खा. सुप्रिया सुळे यांच्या मदतीने घेणार असल्याचे सांगत तिच्यावर तातडीने आवश्यक उपचार करण्यासंबंधी सूचना केल्या होत्या. यावेळी पदाधिकाऱ्यांशी व डॉक्टरांशी चर्चा करताना ना. धनंजय मुंडे यांनी शिवकन्येची काळजी घेण्याबाबत आवश्यक सूचना देत, मी व सुप्रियाताई तिची पुढील काळजी घेऊ असे म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!