Share

Urfi Javed | संपूर्ण शरीराला बँडेज पट्टी! उर्फी जावेदचा नवा लुक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: बिग बॉस OTT (Big Boss OTT) फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन नेटकऱ्यांना चकित करून सोडते. उर्फीने असाच काहीतरी अतरंगी लुक केला आहे. त्याचा कुणालाही अंदाज लावता येणार नाही. उर्फीने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केलेले करत न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस असे अनेक लुक केले आहेत. त्याचबरोबर तिने दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed) चा नाव लुक

आपल्याला कोणती दुखापत झाली तेव्हा आपण त्यावर मलमपट्टी करतो. पण उर्फीने केलेल्या या नवीन लुक मध्ये तिने तिच्या संपूर्ण शरीरावरच मलमपट्टी केली आहे. होय! यावेळी तिच्या संपूर्ण अंगावर बँडेज पट्टी गुंडाळी आहे. या बँडेज पट्टीच्या ड्रेससह उर्फीने डार्क शेडची लिपस्टिक लावून आपला लुक पूर्ण केला आहे. त्याचबरोबर तिने या लोक सोबत हाय पोनी घातली आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीला टेलर स्विफ्टचे अँटी हिरो गाणे वाजत आहे.

उर्फी जावेदने शेअर केलेला हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की या व्हिडिओवर नेटकर्यांकडून मजेदार कमेंट्स येत आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला आहे की, ” मेडिकल मध्ये आता बँडेज पट्टी स्वस्त मिळणार नाही, आता आमचे पेशंट तुमच्याकडे ड्रेसिंग करून घ्यायला येतील.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे, “त्याने कट मारून तुमच्याकडे यावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.”

उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहे. पण त्याचबरोबर दुसरीकडे उर्फीला ट्रोल देखील करण्यात आले आहे. नेटकरी उर्फीला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे उर्फी देखील आता ट्रोलर्स कडे लक्ष देत नाही. मस्त-मोला स्टाईल मध्ये तिचे फॅशन एक्सपिरिमेंट सुरूच ठेवते आणि सोशल मीडियावर शेअर करत असते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!