Share

Supriya Sule । अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,

Published On: 

Supriya Sule । मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सत्तारांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया आल्या. मात्र आज स्वतः सुप्रिया सुळेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर चार ट्वीट्स केले असून त्यातून आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.”

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत घेतला आहे. “सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. पण जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या, ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणतात कि, “मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया”, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलंय.

“राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून हा ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र!” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!