टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच धनंजय मुंडे हे दि. ०९ रोजी अहमदनगर व बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवानगडावर संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.
दरम्यान, २०१४ मध्ये भगवानगड येथे झालेल्या राजकीय घडामोडीनंतर धनंजय मुंडे यांना गडावर येण्यास मज्जाव करण्यात आला होता, मात्र काही दिवसांपूर्वी गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी मुंबई येथे धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ‘मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी या’ असे म्हणत मुंडे यांना निमंत्रित केले होते. भगवान बाबांच्या प्रति असलेली श्रद्धा व महंत नामदेव शास्त्री यांच्या आदेशाप्रमाणे धनंजय मुंडे हे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच गडावर दर्शनासाठी जाणार आहेत.
दि. ०९ रोजी ना. मुंडे हे सकाळी १०.३० वा भगवानगड येथे येऊन दर्शन घेतील, त्यानंतर गहिनीनाथ गड व दुपारी नारायणगड येथे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे मुंडे यांच्या कार्यालयातून कळवण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित , जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

