Share

सपना चौधरी महिलांना स्वावलंबनाचा संदेश देते : धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- मुंडे यांच्या ‘नाथ प्रतिष्ठान परळी’ने आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्साच्या कार्यक्रमात हरियाणाची नृत्यांगणा सपना चौधरीच्या हजेरीने आणि बीभत्स नृत्यामुळे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे टीकेचे धनी बनले आहेत. मुंडे यांनी सोशल मिडिया पोस्ट करून झाल्या प्रकराचे समर्थन केले आहे. सपना चौधरी हरियाणी ची मुलगी भारतातील नाही का?ती पाकिस्तान मधून आली आहे का ? ती महिलांना स्वावलंबनाचा संदेश देते . त्यात काय चूक आहे ? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

सपनाचा डान्स पाहण्यासाठी परळीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. काही तरुणांनी तर चक्क कार्यक्रमाच्या मंडपासाठी उभ्या केलेल्या खांबावर चढून जल्लोष केला. मात्र, या तरुणांच्या अति जल्लोषामुळे गोंधळाची परिस्थिती रोखण्यासाठी खुद्द धनंजय मुंडे यांना प्रेक्षकांना आवरणे कठीण होवून बसले. शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. नेटक-यांनी सोशल मीडियावरून मुंडे यांची खिल्ली उडवली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे धनंजय मुंडे यांनी ?
हरयाणवी नृत्यप्रकार सपना चौधरी सादर करते, पूर्ण अंगभर कपडे घालून ती नृत्य करते. त्यात कुठेही बीभत्स प्रकार नसतो. मीडियाने कलाकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे काळाची गरज आहे. हरियाणी ची मुलगी भारतातील नाही का?ती पाकिस्तान मधून आली आहे का ? ती महिलांना स्वावलंबनाचा संदेश देते . त्यात काय चूक आहे ?

धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवात सपना चौधरीचे ठुमके

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!