मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.
मात्र आत्तापर्यंत गुणवत्ता आहे परंतु आरक्षण नाही. आरक्षण नसल्याने शिक्षणात आणि नोकरीत संधी नाही. गुणवत्ता असूनही फक्त आरक्षणा अभावी शिक्षणात आणि नोकरीत संधी नसल्याने राज्यातील मराठा समाज विवंचनेत अडकला होता. राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा, लाख मराठा’ची हाक देऊन मूक मोर्चाला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत मराठा समाजाने तब्बल 128 जण आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकारी झाले आहेत. क मराठा, लाख मराठा’ हाक ठरली भारी, समाजातील 128 जण झाले अधिकारी असेच सुखद चित्र आज राज्यभर दिसत आहे.
मटका व्यवसायात वडिलांनी जिव गमवला, मुलागा जिद्दीने लढून नायब तहसीलदार बनला
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात नोकरीसाठी 12 टक्के व शिक्षणासाठी 13 टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पहिलीच जाहिरात 2019 मध्ये आली होती. जाहिरातीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. आरक्षणाचा लाभ घेऊन मराठा समाजातील विद्यार्थी/विद्यार्थिनी अधिकारी झाल्याची पहिलीच घटना शुक्रवारी घडल्याने आरक्षणासाठी केलेल्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
आरक्षणाचा लाभ घेऊन असे झाले अधिकारी
उपजिल्हाधिकारी : 13, पोलिस उपअधिक्षक : 11, राज्य कर सहाय्यक आयुक्त : 3, उपमुख्य कार्यकारी अधिकारी : 6, अर्थ विभाग सहाय्यक संचालक : 2, औद्यगिक उपसंचालक : 2, तहसीलदार : 22, उपशिक्षणाधिकारी : 12, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी : 1, सेक्शन ऑफिसर : 6, सहाय्यक गटविकास अधिकारी : 2, भूमिअभिलेख उपअधीक्षक : 3, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक : 2, औद्योगिक अधिकारी : 9, सहाय्यक प्रकल्प संचालक : 1, नायब तहसीलदार : 33, एकूण : 128
परिस्थितीला पायाशी झुकवलं, भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला नायब तहसीलदार

