Share

परळीच्या पाणी टंचाईस पंकजाताईच जबाबदार – धनंजय मुंडे

Published On: 

परळी : परळीच्या भाजपा आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातुन अमर्यादित पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना त्याच जबाबदारी आहेत असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजित पवार व ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आज दि.१९जुलै रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे वाॅटर व्हिलर वितरण समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले मात्र शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि परळीकरांचे पाणीही पळवले असा आरोप करून नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वान धरण कोरडे पडले असतानाही नगरपालिका 80 टॅंकरने पाणीपुरवठा करत आहे आपण स्वतः नाथ प्रतिष्ठान च्या वतीने पंधरा लाख रुपये नगरपालिकेला दिले नाथ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वखर्चाने पाणीपुरवठा करत आहेत याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही मुंडे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!