Share

Bhaskar Jadhav | राणे कुटुंबातील व्यक्तिंवर अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Published On: 

Bhaskar Jadhav | पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन राणे कुटुंबातील भाजप नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी देखील भास्कारांना धारेवर धरलं. हा वाद सुरु असतानाच पुणे येथे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार योगेश शिंगटे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
सामाजिक भावना दुखावल्या असून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यात सामाजिक, भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास चिथवाणी देऊन केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक असताना सदर पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक आगळीक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप जाधवांवर करण्यात आला आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्यावर पोलिसांनी भादंवि कलम 153 अ, 505/1, 505/2, 500, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 19 ऑक्टाेबरला घडलेला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!