Share

शेट्टींना राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीचे नेता व्हायंच होतं, मतदार संघात त्याचं दुर्लक्ष – धैर्यशील माने

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : जनता खासदार राजू शेट्टी यांच्यावर नाराज होती, तसेच राजू शेट्टी हे राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीचे नेते होयला गेले आणि मतदारसंघातील शेतकऱ्याला विसरले, त्यामुळे जनतेने माझा बाजूने कौल देवून माझ्यावर विश्वासात्मक जबाबदारी दिली आहे, असे म्हणत हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार धैर्यशील माने यांनी जनतेचे आभार मानले. ते आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी धैर्यशील माने म्हणाले की, कार्यकर्त्यांची मेहनत आणि उद्धव ठाकरेंनी दाखवलेला विश्वास यामुळे मी यश संपादन करू शकलो. तसेच हा माझा विजय नसून माझ्यावर विश्वास ठेवलेल्या जनतेचा विजय आहे. यावेळी माने यांनी राजू शेट्टी यांच्याविषयी देखील भाष्य केले. ते म्हणाले की, जनता राजू शेट्टीवर नाराज होती. कारण खासदार राजू शेट्टी हे देश पातळीवरील शेतकरी चळवळीचा चेहरा होयल गेले आणि मतदारसंघातील खऱ्या शेतकऱ्यांना विसरले. त्यामुळे जनतेने माझा बाजूने कौल देवून माझ्यावर विश्वासात्मक जबाबदारी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!