अहमदाबाद – बहुचर्चित इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणी गुजरातमधील सीबीआय कोर्टाने माजी पोलीस अधिकारी डी जी वंजारा आणि एन के अमीन यांना दोषमुक्त केले आहे. इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणात आमच्याविरोधात सुरु असलेला गुन्हेगारी खटला रद्द करावा, अशी मागणी या दोघांनी केली होती. त्यांनी केलेला अर्ज अखेर कोर्टाने स्वीकारला आहे.
इशरत आणि तिचे मित्र हे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याच्या मोहिमेवर असलेले दहशतवादी होते, असा दावा त्यावेळी गुजरात पोलिसांकडून करण्यात आला होता. या चकमकीनंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. ही चकमक बनावट असल्याचा देखील आरोप काही मंडळींनी केला होता.
“जून २००४ मध्ये मुंबईतील १९ वर्षीय इशरत जहाँ, तिचा मित्र जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि मूळ पाकिस्तानी जिशान जौहर यांना तत्कालीन पोलीस महानिरीक्षक डी जी वंजारांच्या पथकाने १५ जून २००४ रोजी अहमदाबादजवळ चकमकीत ठार मारलं होतं”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

