🕒 1 min read
उस्मानाबाद : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून तुळजाभवानी देवीचे दर्शन सुरू झाले. त्यासाठी सशुल्क विशेष दर्शनाची सुविधाही होती. मात्र, काही बदमाशांनी मंदिराची बोगस वेबसाइट तयार करून अनेक भक्तांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मंदिराची shrituljabhavani.org अशी अधिकृत वेबसाइट आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भाविकांची विविध पुजा करण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या 4 वेबसाईटच्या चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अज्ञात लोकांनी www.tuljabhawanipujari.com, www.tuljabhwanimandir.org, www.shrituljabhavani.com, wwww.epuja.co.in या चार वेबसाईट सुरु करुन भाविकांची लूट केली असल्याचे स्पष्ट झाले, विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तुळजाभवानी नवरात्र काळात राजरोस सुरु होता. याबाबत बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या बोगस वेबसाईटवरुन तुळजाभवानी देवीच्या अभिषेक, अलंकार महापूजा, खण-नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान अशा पूजा करण्याचे अमिश दाखवुन ऑनलाईन पैसे जमा करून घेतले जात होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420 फसवणूक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 सी आणि डी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बिहारींना पोटासाठीच नव्हे शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं?, कन्हैय्या कुमारचा सवाल
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास…’, सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची मागणी
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या नात्यासंदर्भात अरूसा आलम यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’


