नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचे 10 लाखांहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झालं असल्याचं म्हटलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही. के मोंगा यांनी याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. डॉ. मोंगा म्हणाले की, प्रत्येक दिवशी देशात 30 हजारहून जास्त रुग्ण समोर येत आहेत. ही फार गंभीर स्थिती आहे. आता हा संसर्ग देशातील ग्रामीण भागात देखील सुरु झाला, याचा अर्थ असा आहे की, देशात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झालं आहे, असं डॉ. मोंगा यांनी म्हटलंय.
कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार? असं डॉक्टर मोंगा यांनी म्हटलं आहे.
मंदिरांसाठी विशेष पॅकेज द्या, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारकडे मागणी
इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजेच समूह संसर्ग सुरू असल्याचं प्रथमच मान्य केलं आहे. देशातील वाढती रुग्ण संख्या आणि त्यात आता आयएमएने कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाल्याचं मान्य केल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. तसेच देशातील मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, ओडिशा यांसारख्या राज्यात साथीचे आजारही वाढत चालले आहेत.
भारतामध्ये कोरोना बाधितांची एकूण रुग्ण संख्या १०,७७,६१८ इतकी झाली आहे. त्यापैकी ६,७७,४२३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ३,७३,३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत देशात २६,८१६ जणांचा मृत्यू झाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

