Share

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी लक्ष्मणने निवडली प्लेइंग इलेवन ; ‘या’ खेळाडूंना दिला डच्चू

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय संघाचे श्रीलंकेतील पहिले सराव सत्र शुक्रवारी पार पाडले.

तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने श्रीलंकेविरोधात वनडे सीरीजसाठी भारताच्या प्लेइंग इलेवन  ची घोषणा केली आहे. लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात या प्लेइंग इलेवनची घोषणा केली.

 व्हीव्हीएस लक्ष्मण यांची प्लेइंग इलेवन :

सलामीला शिखर धवन आण पृथ्वी शॉ असतील. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या. भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहलची यांची निवड केली आहे तर लक्ष्मणने पुणेकर ऋतुराज गायकवाड, नितिश राणा आणि देवदत्त पडिक्कल यांना आपल्या संघात स्थान दिले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!