Share

देवेंद्र फडणवीस आणि आठवलेंच्या सुरक्षेत कपात : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : ठाकरे सरकारने राज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. तर अनेक नेत्यांची सुरक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा रद्द केली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना एस्कॉर्ट शिवाय सुरक्षा देण्यात आली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ही सुरक्षा कपात करण्यात आली आहे. उज्वल निकम यांना एस्कॉर्टसह वायप्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आधी वायप्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करण्यात आली आहे. सिन्हा यांना एस्कॉर्टसह वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कपात केली नसून काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे यांच्या सुरक्षेत देखील कपात केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मुंबई शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या सुद्धा सुरक्षा काढून घेण्यात आल्याआहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!