Share

माता न तू वैरिणी : चार महिन्यांच्या बाळाला सोडले रस्त्याकडेला

Published On: 

पुणे : चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अज्ञात व्यक्तींकडून 4 महिन्यांचे स्त्री जातीचे बाळ सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी समोर आला. या बाळाला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे. एका झाडाखाली कापडामध्ये गुंडाळून ते सोडून दिले होते. याबाबत श्रीकांत गोरे यांनी स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील यांना माहिती दिली.

दगडे त्याचबरोबर चांदणी चौकात असणारे वाहतूक पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले. दगडे यांनी कोथरुड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पाऊस असल्याने गाडीतून बाळाला कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

कोथरुड येथे सायंकाळी पावणे सहा वाजता चांदणी चौकातील उतारावरील भागातून नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तेथेच असलेल्या वाहतूक पोलिसांना सांगितले. पोलिस त्या ठिकाणी गेले, त्यावेळी कापडात बांधून टाकून दिलेले अवघ्या पाच महिन्याचे बाळ पावसात भिजताना दिसले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला उचलून घेतले. त्या इवलुश्या गोडुलीच्या स्मितहास्याने पोलिसही क्षणभर गहिवरले.

राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज मतदान, ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिष्ठा पणाला

वारजे वाहतूक विभागामध्ये पोलिस हवालदार असलेले सुरेश शिंदे व पोलिस शिपाई सुजय पवार हे दोघेही त्यांच्या सहकाऱ्यासमवेत गुरुवारी चांदणी चौकात वाहतूक नियमन करीत होते. सायंकाळी पावणेसहा वाजता पावसाची रिपरीप सुरु होती. तेवठ्यात कोथरुडच्या दिशेने जाणाऱ्या उताराच्या रस्त्याच्याकडेला भागात नागरीकांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी याबाबत शिंदे व पवार यांना सांगितले. त्यामुळे ते दोघेही धावतच तेथे गेले. त्यावेळी कपडयात बांधलेले बाळ पावसातच कोणीतरी सोडून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनीही बाळाला उचलून घेत आपल्या कवटाळले. ते भुकेने व्याकुळ झाल्याचे पाहुन पोलिसांनी लगेचच त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था केली. व स्थानिक कोथरुड चे नगरसेवक किरण दगड़े पाटिल यांनी सुद्धा तिथे तत्काळ येऊन पुढील तपासासाठी पोलिसांना सहकार्य केले.

अजित दादा म्हणतात शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!