Share

फडणवीसांच्या ‘अतिआत्मविश्वासी’ आणि ‘घमंडी’ वृत्तीमुळे महाविकास आघाडी अस्तित्वात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलं आहे.यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आवरावं अशी विनंती केली आहे.

काल अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच राज्यातील भाजप आणि शिवसेना यांचा काडीमोड होऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून त्या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पक्षावर टीका करत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष आणखीनच दुरावले आहेत.

किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस दोघांना शिवसेनेवर राजकीय आगपाखड करण्यापासून थांबवा अशी विनंती संघाकडे केली आहे. हिंदुत्ववादी पक्ष या टीकेमुळे अजून दूर जात आहे अस त्याचं म्हणण आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.

ते म्हणतायेत,’महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांची अरेरावी , घमंडी वृत्ती आणि अति आत्मविश्वास कारणीभूत आहे असा सणसणीत आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळेच युती तुटली असा आरोपाही त्यांनी केला आहे.’ याबाबतच वृत्त ABP माझा या वाहिनेने दिलं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!