मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला चांगलेच धारेवर धरले. मात्र यावरच राम मंदिराबाबत तुम्ही बोलता, पण राम मंदिर आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या, तुम्ही तोंडाच्या वाफा दडवत होता. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली आहे.
तसेच राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात अयोध्येत राम मंदिर तयार होत आहे. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय? तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. आताही सोडवत नाही. तुमचं हिंदुत्व कागदावर आहे. औरंगाबादचं संभाजी नगरही केलं नाही. आम्ही प्रयागराज करून दाखवलं. हिंदुत्व हे बोलून दाखवायचं नसतं करून दाखवायचं असंत. असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानही दिले आहे. आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता? असा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह
- “साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात”, फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- सिल्लोड येथील बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक शिवसैनिकांना प्रेरणा देणारे शक्तीस्थळ ठरेल-अब्दुल सत्तार
- मेकअप सुरू असताना अभिनेत्री सारा अली खानसोबत घडली अशी भयावह घटना
- “इंदिरा गांधी पंतप्रधान असताना…”; बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे उदाहरण देत भुजबळांनी टोचले पटोलेंचे कान

