🕒 1 min read
मुंबई : गुरूवारी दसरा मेळावा पार पडला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने मेळाव्यात शक्तीप्रदर्शनही दाखवल असल्याचं आपण पाहिलं असेल. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जबरदस्त आरोप, टीकेबाजी केली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवावरही एक वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यतील राजकीय वर्तुळात त्याबाबतची खूप चर्चा रंगली आहे. अनेक नेत्यांनी त्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असल्याचं दिसून येतं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करुन टिप्पणी करणे अतिशय खालच्या दर्जाचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,उद्धव ठाकरेंनी आपले शब्द परत घेतले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं पटत नाही, पण काही पथ्य पाळली पाहिजेत. तसेच, नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का?, असा सवाल कर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
दरम्यान, काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक?, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | ‘या’ लहान बाळाने पक्षाला चमच्याने भरवले आईस्क्रीम, पाहा व्हिडिओ
- Ramdas Kadam | चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’ रामदास कदमांनी सांगितला, म्हणाले…
- Sudhir Mungantiwar । ठाकरेंनी विजयादशमीचा उत्सव हा शिमग्याचा उत्सव करण्याचं काम केलंय; मुनगंटीवारांचा टोला
- Chandrakant Khaire | “भुमरेंचं योगदान काय?”; चंद्रकांत खैरे यांचा खोचक सवाल
- Yamaha Bike | Yamaha ने वाढवल्या आपल्या ‘या’ बाइक्सच्या किमती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
