टीम महाराष्ट्र देशा: सध्या सुरू असलेल्या फेस्टिव्ह सीजन मुळे देशात सगळीकडेच वस्तूंची मागणी वाढत आहे. परिणामी मागणी वाढल्यामुळे गोष्टींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत देशातील मोटरसायकल उत्पादक कंपनी Yamaha (यामाहा) ने देखील आपल्या बाईक्स च्या किमतीत वाढ केली आहे. यामाहा ने आपल्या R15 V4, MT-15 V2 आणि Aerox या मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली आहे.
Yamaha FZS 25
Yamaha ने तिच्या लोकप्रिय बाईक Yamaha FZS 25 किमतीत वाढ केली आहे. कंपनीने या बाईकची किंमत तब्बल 1,000 रुपयांनी वाढवली आहे. या यामाहा बाईकच्या मॅट-कॉपर आणि मॅट-ब्लॅक कलुरमुळे या बाईकची किंमत वाढली आहे. ही बाईक आता 1,52,400 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.
Yamaha FZS 25 बरोबरच कंपनीने FZ 25 आणि FZ-X मॉडेलच्या किमतीत वाढ केली आहे. FZ 25 बाईक बाजारामध्ये 1,47,900 रुपयांमध्ये तर FZ-X बाईक 1,33,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Yamaha MT-15 Version 2.0
Yamaha MT-15 Version 2.0 या मॉडेलच्या किमतीमध्ये कंपनीने 500 रुपयांनी वाढ केली आहे. वाढ झाल्यानंतर या मॉडेलची किंमत आता 1,64,900 रुपये आहे. या बाईकमध्ये 155cc इंजिन असून ते 18.4bhp पावर देण्यासाठी सुसज्ज आहे.
Yamaha R15M WGP 60th Edition
Yamaha R15M WGP 60th Edition या मॉडेलच्या किमतीमध्ये देखील 1,000 रुपयांनी वाढ करण्यात आली. किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर या गाडीची किंमत 1,91,300 रुपये एवढी आहे. या बाईकमध्ये 155cc इंजिन आहे, जे 18.4PS पॉवर आणि 14.2Nm टार्क निर्माण करू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Khaire | हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे- चंद्रकांत खैरे
- Maharashtra Rain Update | राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा जोर कायम
- NCP| “काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार”
- Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा गाजलेला ‘तो’ किस्सा
- India vs Pakistan महामुकाबला सुरू! पाकिस्तानने घेलता प्रथम फलदांजीचा निर्णय


