🕒 1 min read
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते.वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.
मा. गो. वैद्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. मा.गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी निघणार आहे. अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. वैद्य यांचे आज दुपारी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ चिंतक, ज्येष्ठ संपादक-विचारवंत श्री मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला आम्ही सारे मुकलो आहोत. बाबुराव शतायुषी होतील, ही खात्री होती. पण, काळाने त्यांना आमच्यातून हिरावून घेतले. अशा भावना राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान, कोणताही किचकट विषय सहजसोपा करून सांगण्याचे कसब, मराठी भाषा आणि व्याकरणावरील सिद्धहस्त लेखक अशी कितीतरी बिरूदं अपुरी पडतील, इतकं अथांग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन पाहत असे. केवळ संघसेवा नव्हे तर संघविचार रूजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यासाठी हालअपेष्टाही सहन केल्या, अशा मा. गो. वैद्य यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून न निघणारी अशीच आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अस फडणवीस म्हणाले आहते.
दरम्यान,1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते.
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ प्रचारक मा. गो. वैद्य यांचे निधन; आदरांजली अर्पण करताना महापौर संदीप जोशी झाले भावूक
- कालच्या पराभवानंतर इंग्लडच्या माजी दिग्गज कर्णधाराने उडवली टीम इंडियाची खिल्ली; चाहत्यांनी घेतला चांगलाच क्लास
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- आगामी विधानसभेत शिवसेनेचे 105 आमदार असतील- संजय राऊत
- पालिका निवडणुका महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढणार?; छगन भुजबळांचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
