Share

माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा ! ; भाजपचे राज्यपालांना निवेदन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करून पत्रकार संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असं म्हणण मांडलं.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांना एक निवेदन दिलं. यामध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांना गृहमंत्र्यांनी स्वत: पत्र लिहून एफआयआर दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची धमकी दिली. या सरकारच्या काळात लोकसाहीच्या चौथ्या स्तभांची मुस्कटदाबी होतीये, असा आरोप त्यांनी केला आहे

देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर यावेळी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार, मुंबई भाजपाध्यक्ष मंगरप्रभात लोढा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपतर्फे राज्यपालांना निवेदन दिलं.

दुसरीकडे एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावर बांद्रा गर्दीचा ठपका ठेवत त्यांना तातडीने उस्मानाबाद येथून मुंबईला आणण्यात आले. या काळात त्यांचा अनेक हॉटस्पॉट भागातून प्रवास झाला. राज्य सरकार सूडाने वागत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!