Share

महिला सुरक्षा आणि सन्मान संकल्पनेवर आधारित भोसरीत इंद्रायणी थडीला उद्यापासून सुरवात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी या उद्देशाने शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून भोसरी येथे इंद्रायणी थडी’चे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २९) ते सकाळी 10 वाजता उदघाटन होणार आहे, अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, संयोजिका व शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

भोसरीतील दिवंगत  अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भरविलेल्या ‘इंद्रायणी थडी’ चे हे दुसरे वर्ष आहे. या जत्रेत खाद्यमहोत्सवात मनोरंजन, प्रबोधन आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यारी ही जत्रा लक्षवेधी ठरणार आहे. या जत्रेत सर्वांना मोफत प्रवेश असल्याची माहिती संयोजिका व शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा लांडगे यांनी दिली.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ ही ‘थीम’ घेवून आम्ही ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे दुसरे वर्ष साजरे करीत आहोत. भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे सुवर्ण प्रवेशव्दार खुले केले. थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा वाडा पुण्यामध्ये ‘समता भूमी’ येथे आहे. त्याची भव्य प्रतिकृती मुख्य प्रवेशव्दारावर उभारली आहे. या प्रवेशव्दारावर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, लता मंगेशकर, कल्पना चावला आणि सिंधूताई सपकाळ यांच्या भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. वाड्यात प्रवेश करताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा लक्ष वेधून घेत आहे.

त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या संविधानभवनाची प्रतिकृती, भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती, अयोध्येतील नियोजित राम मंदिराची प्रतिकृती, ‘रामायण’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो, समतेची शिकवण देणारे महात्मा जोतीराव फुले आणि महिलांसाठी पहिला शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची साक्ष देणारा ‘महात्मा फुले वाडा’ची प्रतिकृती, ग्रामीण संस्कृतीची ओळख पटवून देणारी ‘ग्रामसंस्कृती’, बाल जत्रा, गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन, शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, महिलांसाठी स्व: संरक्षणाचे धडे, प्रबोधनात्मक कीर्तन, अभंग बँड, पारंपरिक नृत्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा, मंगळागौरी खेळ आणि उखाणे स्पर्धा अशा अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी जत्रेत येणाऱ्या नागरिकांना अनुभवता येणार आहे.

गुरुवारी (दि. 30) सायंकाळी 5 वाजता चला हवा येऊ द्या हा मनोरंजनाचा कार्यक्रम त्याचबरोबर शुक्रवारपासून खेळ बाहुल्यांचा (पपेट शो), मॅजिक शो, हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रवचन, योगेश सुपेकर यांचा ऑकेस्ट्रा, महिलांसाठी फॅशन शो, बाल जत्रा, मनोरंजन, कला, सांस्कृतिक, गावरान खाद्यपदार्थ महोत्सव, सामाजिक उपक्रम अशा भरगच्च विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असणारी या वर्षीची इंद्रायणी थडी जत्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ठरेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!