🕒 1 min read
Devendra Fadanvis | नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, कर्नाटक सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीच्या जत तालुक्यावर दावा करण्याबाबत कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे पाण्याच्या प्रश्नावर कर्नाटकात सामील होऊ इच्छित असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जत तालुक्याकडे कर्नाटकची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
“सीमावादाच्या प्रश्नावर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सीमाभागातील लोकांची पूर्ण मदत करण्याचे आपण ठरवलेले आहे. त्यासाठी काही योजनांची सुरुवात करण्यात येणार आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, या अगोदरही काही योजना सुरू होत्या. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तसे विधान केले असावे. महाराष्ट्रातील एकही गाव कोठेही जाणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणी यांच्यासह सर्व गावं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
“मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा कर्नाटकशी बातचित केली होती. म्हैसाळच्या सुधारित योजनेत या गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आली होता. त्यासाठीची योजनाही तयार झाली होती. मागील अडीच वर्षाच्या काळात या योजनेला मान्यता देण्यात आली नाही. करोनामुळे यावर निर्णय घेता आला नसावा. मात्र आता आम्ही या योजनेला तत्काळ मान्यता देणार आहोत.” तसेच या गावांना लवकरच पाणी मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “…तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार राहणार नाही” ; संजय राऊत यांची टीका
- Aditya Thackeray | “आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता…”, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात
- Salman Khan | मेहुण्यानंतर सलमान खानची भाची करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण
- Rohit Pawar | “गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय” रोहित पवार आक्रमक!
- Disha Salian | अखेर दिशा सालियनच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
