टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरवात झाली आहे. राजकीय मंचावरून आरोप – प्रत्यारोप, टीका – टिपण्णीला सुरवात झाली आहे. धुळ्यातील सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस आघाडीवर उपोरोधिक टीका केली आहे. कॉंग्रेस आघाडीचा जाहीरनामा म्हणजे जगातली सर्वच आश्वासन दिली आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
काही दिवसांपूर्वीचं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यातून जनतेला अनेक आश्वासन देण्यात आली. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोले लगावले आहेत. जाहीरनामा म्हणजे जगातले सगळेच आश्वासन दिलेत. या जाहीरनाम्यात एकच आश्वासन द्यायचं राहिलंय. ते म्हणजे, ‘महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक ताजमहाल बांधून देऊ,’ एवढंच आश्वासन द्यायचं राहिलंय, असे म्हणत फडणवीस यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.
दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भविष्यात एकत्र येणार आहेत. दोन्ही पक्ष आता थकले आहेत. त्यामुळे लवकरच विलीनीकरण कराव लागणार आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते. सोलापूर येथे बोलताना शिंदे यांनी याबाबत वक्तव्य केले होते. यावर ही फडणवीस यांनी टोले लगावले. राहुल गांधींनाही महाराष्ट्रातील पराभव मान्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटलंय. ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेलेत, महाराष्ट्रातील पराभव त्यांनाही माहितीय. पवारांचा पक्ष अर्धा रिकामा झालाय, उरलेला पक्ष निवडणुकीनंतर रिकामा होईल, असे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181860323352928256?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181856719606992897?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

