Share

राममंदिराचा लढा हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी होता :  देवेंद्र फडणवीस 

Published On: 

मुंबई : राममंदिर उभारण्यासाठीचा लढा हा पराजीत मानसिकतेत वावरणाऱ्या हिंदू समाजाला जागे करण्यासाठीचा लढा आहे. या लढ्याचा समग्र आढावा घेणारे ‘अयोध्या’ हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जाईल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी फडणवीस बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा होते.फडणवीस म्हणाले की,  भांडारी यांनी सखोल संशोधन करून अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्ती लढ्यामागची प्रेरणा विस्ताराने कथन केली आहे.

हिंदू समाजाला कायम पराभूत मनोवृत्तीत ठेवण्यासाठी परकीय आक्रमकांनी राम मंदिर उध्वस्त केले. या मानसिकतेमधून हिंदू समाजाला बाहेर काढण्यासाठी हा लढा सुरू करण्यात आला.अयोध्या आणि रामजन्मभूमी या विषयावर धादांत असत्य पसरवण्याचा प्रयत्न झाला. या विषयातील सत्य जगासमोर आणण्याचा मी प्रयत्न केला. या विषयावर आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मनोगत लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार यांचीही या प्रसंगी भाषणे झाली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!