Share

‘नक्षलग्रस्त भागातील नागरिकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक’

Published On: 

गडचिरोली : दुर्गम, नक्षलग्रस्त भागात प्रत्येक नागरिकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच त्यासाठी मुलभूत सुविधांची गुणवत्ता व संख्या योग्य प्रकारे राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले. पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर आधारीत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दिपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार अशिर्वाद, सहायक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवाराव होळी, आमदार कृष्णा गजबे उपाध्यक्ष पोरेटी उपस्थित होते.

नक्षलवाद कमी करण्यासाठी दुर्गम भागात जनतेला मुलभूत सुविधा पुरविणे आवश्यक आहे असे ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावे, आर्थिक चलन वाढावे याकरिता विविध कामे, योजना, प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन खंबीरपणे जिल्ह्याच्या पाठीमागे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. वीज, रस्ते, पूल, पिण्याचे पाणी व चांगली आरोग्य सुविधा यामधील प्रत्येक घटाकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यास स्थानिक नागरिक विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करा त्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी या बैठकीत उपस्थितांना दिली. जिल्ह्यात विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या कंत्राटदार किंवा अधिकारी कर्मचारी यांच्यावर आवश्यकता असल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगितले. वनविभागातील नियमांचा बागुलबुवा बाजूला ठेवून विकास कामे तत्काळ मार्गी लावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विविध रखडलेल्या कामांबाबत पालकमंत्री यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी वनविभागाकडून प्रलंबित मंजुर असलेल्या विविध कामांबाबत चर्चा केली व वन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देने बाबत विनंती केली.

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘उडान’ सारखे उपक्रम राबवावेत – यशोमती ठाकूर

जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भाव नियंत्रणात

या बैठकीत जिल्हयातील कोरोना कोविड-19 प्रादुर्भावाबाबत तपशिल त्यांनी जाणून घेतले. त्यांनी प्रशासनाच्या उपाययोजनांचे कौतूक केले. जिल्ह्यात स्थिती हाताळण्यास प्रशासनाला यश आले असले तरी भविष्यात अजून मोठया प्रमाणात कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कोरोना तपासण्यांची संख्या वाढवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. राज्यस्तरावर ही सर्व जनतेच्या सहकार्याने व मेहनतीने तसेच प्रशासनाच्या योग्य अंमलबजावणीमुळे समूह संसर्ग रोखण्यात राज्य शासनला यश आले आहे असे ते यावेळी म्हणाले.

अँटीजेन टेस्ट आणखी मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे पालकमंत्री यांचे प्रशासनाला निर्देश – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाला मोठ्या प्रमाणात ॲन्टीजेन टेस्ट करण्यासाठी सांगितले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्सींग तसेच मास्क लावण्याचे गरजेचे आहे असे सांगितले. आपला जिल्हा पुन्हा ग्रीन झोन कडे कसा नेता येईल हे बघावे. हळुहळु जिल्हा अनलॉक होत असतांना लोकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन तसेच मास्क लावूनच काम करावे. आरोग्य यंत्रणेला पैशाबाबत कमतरता भासू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा रुग्णवाढीचा दर रोखण्यासाठी ‘चेस द वायरस’ या मिशन अंतर्गत राज्य सरकार काम करत आहे. माझ्या नगरविकास खात्यातून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतना विशेष निधी देणार. कोरोना उपाययोजना साठीचा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी कोविडग्रस्त रुग्णांसाठी अंडी – दूध देण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. सुदैवाने सर्वांच्या सहकार्याने आणि मेहनतीने समूह संसर्ग रोखण्यात राज्य सरकारला येत आहे. रेमडीसीविर / टोक्लीझुमब इंजेकॅशन उपलब्ध करून देणार असे सांगितले.

राष्ट्रवादीचे बगदूरे यांच्या शुभेच्छापर जाहिरातीमध्ये राणा जगजितसिंह पाटील झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!