Share

पक्षाचा उमेदवार असतानाही अजित पवारांनी दिला अपक्ष उमेदवाराला पाठींबा

Published On: 

टीम महारष्ट्र देशा : करमाळा विधानसभा मतदारसंघात वेगळीच राजकीय समीकरण पाहिला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा स्वतः चा उमेदवार असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठींबा दिला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार संजय पाटील यांनी खंत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही काल अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर करणे हे अजित पवारांचे दुर्दैव आहे, असे संजय पाटील म्हणाले. तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी दोन वेळा मतदार संघाचा दौरा पूर्ण केला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम शरद पवारांवर आहे. त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादीला यश मिळणार आहे. मी पूर्ण ताकदीनिशी शरद पवारांच्या विचारा नुसार निवडणूक लढवणार, असे संजय पाटील म्हणाले आहेत.

अधिकृत उमेदवाराला एवढा विश्वास असताना ही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदाराचा प्रचार न करता अपक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. करमाळ्यात अजीर पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठींबा दिला आहे. तर सांगोल्यात शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुख यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे दोन्ही मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181477043160018946?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181458804342284289?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181446252577226752?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!