Share

‘आगामी दोन विश्वचषक खेळायची इच्छा’; ३६ वर्षीय दिनेश कार्तिकने व्यक्त केली भावना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यष्टीरक्षक म्हणून गेल्या काही वर्षात भारताकडे महेंद्रसिंह धोनी हा सर्वोत्कृष्ट पर्याय होता. धोनीने आंतरराष्ट्रीय पदार्पन केल्यानंतर भारतीय संघात इतर यष्टीरक्षक हे काय संघाबाहेर राहिले. यात पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक हे दोन मुख्य प्रशिक्षक होते. धोनीच्या पदार्पणानंतर त्याच्या निवृत्तीपर्यंत इतर यष्टीरक्षक कायम संघाबाहेर राहिले.

२०१८ साली झालेल्या निदाहास  ट्रॉफीतील अंतिम सामन्यात मोक्याच्या क्षणी ८ चेंडुत २८ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर दिनेश कार्तिकने फलंदाज म्हणून २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान पटकावले होते. मात्र त्या स्पर्धेनंतर मात्र तो अद्यापही पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकने आगामी 2021 आणि 2022 टी-२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा आहे. यादरम्यान त्यालाही आशा आहे की तो या विश्वचषकात निवड होणाऱ्या संघात स्थान पटकावेल.

महेंद्रसिंह धोनीच्या आधी दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र धोनीच्या आगमनानंतर तो संघाबाहेर झाला. यानंतर २०१९ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्युझीलंड विरुद्ध २५ चेंडुत अवघ्या ६ धावा केल्या होत्या. यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यादरम्यान दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडुन खेळत आहे. तसेच काही काळ त्याने संघाचे नेतृत्वही केले आहे. भारतीय संघात रिषभ पंत आणि के एल राहुल यासारखे युवा खेळाडू असताना ३६ वर्षीय दिनेश कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!